Ganesh Chaturthi Marathi Bhajan श्री गणेशाचे भजन

श्री गणेशाचे भजन: गणेश भगवान के लोकप्रिय मराठी भजनों का संग्रह

श्री गणेशाचे भजन: लोकप्रिय मराठी भजन – गणेश चतुर्थी हिन्दुओं का एक प्रमुख त्यौहार है। यह त्यौहार भारत के विभिन्न भागों में मनाया जाता है किन्तु महाराष्ट्र में बडी़ धूमधाम से मनाया जाता है। पुराणों के अनुसार इसी दिन गणेश का जन्म हुआ था। गणेश चतुर्थी पर हिन्दू भगवान गणेशजी की पूजा की जाती है। कई प्रमुख जगहों पर भगवान गणेश की बड़ी प्रतिमा स्थापित की जाती है। इस प्रतिमा का नौ दिनों तक पूजन किया जाता है। बड़ी संख्या में आस पास के लोग दर्शन करने पहुँचते है। नौ दिन बाद गानों और बाजों के साथ गणेश प्रतिमा को किसी तालाब इत्यादि जल में विसर्जित किया जाता है।

श्री गणेशाचे भजन: लोकप्रिय मराठी भजन

मंगलमूर्ती माझे आई, मजला ठाव द्याव पायीं॥१॥
सिद्धीबुद्धि मयुरामाई, मलजा ठाव द्यावा पायी॥२॥

श्रीगजानन जय गजानन, जय गजानन मोरया॥३॥
श्रीगणनाथ जय गणनाथ। मीं अपराधी घ्या पदरांत॥४॥

श्रीगजाननपद सेवावे, काया वाचा मनोभावें॥५॥
हेरंबमाय दाखवि पाय, दुजवीण मगेना करूं मीं काय॥६॥

गजानन, गजानना, पार्वतीच्या नंदना मोरया गजानना॥७॥
धांवत ये वा गणराया, दीनाते मज ताराया॥८॥

पायीं हळूहळू चाला, मुखानें गजानन बोला॥९॥
ज्याला म्हणती पुत्र शिवाच, तो हा गणपती मित्र जिवाचा॥१०॥

मोरया रे, बाप्पा मोरया रे, मोरया रे, बाप्पा मोरया रे॥११॥
गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लौकर या॥१२॥

लंबोदर गिरीजा नंदना देवा (Lambodar Girija Nandana Deva)

लंबोदर गिरीजा नंदना देवा
पूर्ण करी मनोकामना देवा  || धृ ||

हे मन पावन तव पदी सेवन
बुद्धी द्यावी गजानन देवा || १ ||

पायी घागुऱ्या वाजती रुणझुण
नाचत यावे गजानन देवा … || २ ||

एका जनार्दनी विनवितो तुज
विद्या द्यावी गजनना देवा … || ३ ||

घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा (Ghatali Rangoli Gulalachi, Swari Aali Ganarayachi)

घातली रांगोळी गुलालाची, स्वारी आली गणरायाचा || धृ ||

दुर्वा पुष्प बहु प्रिय माळा, हार रत्नाचा शोभला …. || १ ||

नैवेघ मोदकाचा केला, प्रसाद वाटुनी काला केला || २ ||

दास म्हणे श्री गणराया, मस्तक हे तुमच्या पाया… || ३ ||

श्री गणेशा शारदा, करीशी गाथना (Shri Ganesha Sharada, Karishi Gathana)

श्री गणेशा शारदा, करीशी गाथना
आम्ही वारांगणा रमे ऐसा …… || धृ ||

येथे आम्ही मानवाने वर्णावेते काय
स्वर्गीचे सुरवर बंदिती पाय …. || १ ||

ज्याच्या गायनाने तटस्य शंकर
तयापरी पार नाही तुझे….. || २ ||

तुका म्हणे आम्ही किंकरते किती
इंद्राची मस्ती नागविती …. || ३ ||

अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग (Ashi Chik Motyachi Maal Hoti G Tis Tolyachi G)

अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग
जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग … || धृ ||

ह्या चिक माळेला रेशमी मऊ दार दोरा ग
मऊ रेशमांच्या दोऱ्यात नारंगी माळ ओविल ग || १ ||

अशी चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग
अशी तीस तोळ्याची माळ गणपतीला घातली ग || २ ||

मोरया गणपतीला फुलून माळ शोभली ग
अशी चिक माळ पाहून, गणपती किती हसला ग || ३ ||

त्याने गोड हसुनी मोठा आशीर्वाद दिला ग
चला चला करूया नमन गणरायाला ग

त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात
शुभ कार्याला ग || ४ ||

ॐ कार प्रधान रूप गणेशाचे (Omkar Pradhan Rup Ganesha Che)

ॐ कार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ….. || धृ ||

अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला  || १ ||

ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप ….. || २ ||

तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासाचीया ….. || ३ ||

हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभूवरा (He Shiv Shankar Girija Tanaya Ganayaka Prabhuvara)

हे शिवशंकर गिरीजा तनया गणनायका प्रभूवरा
शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा || धृ ||

प्रसन्न होऊनी विघ्न हरावे
नम्र कलेचे सार्थक व्हावे
तुझ्या कृपेने यश कीर्तीचा बहर येऊ दे भरा || १ ||

वंदन करुनी तुजला देवा
रसिक जनाची करितो सेवा
कौतुक होऊनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा
हे शिवशंकर गिरीजा तनया || २ ||

तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा (Tuch Sukh Karta Tuch Dukh Harta Avaghya Dinachya Natha)

तूच सुखकर्ता, तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनाच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा || धृ ||

पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्चाने एकदा हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची, वाचावी कशी हि गाथा || १ ||

पहा आली कशी आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ,
गुळ फुटणे खोबर नि केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ,
करी भक्षण आणि रक्षण, तूच पिता तूच माता… || २ ||

नाव काढू नको तांदळाचे, केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे, दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद आता….. || ३ || 

प्रथम तुला वंदितो कृपाळा (Pratham Tula Vandito Krupala)

प्रथम तुला वंदितो कृपाळा
गजानना गणराया || धृ ||

विघ्नविनाशक, गुणीजन पालक
दुरित तीमिर हार का, सुखकारक तू दु:ख विदारक
तूच तुझ्या सारखा, वक्रतुंड ब्रम्हांड नायका
विनायक प्रभुराया ….. || १ ||

सिद्धीविनायक तूच अनंता
शिवात्मजा मंगला, शेंदूर वदना विद्याधीशा
गणाधिपा वत्सला, तूच ईश्वरा साह्य करावे,
हा भव सिंधू तराया…. || २ ||

गजवदना तव रुप मनोहर
शुक्लांबर शिवसुता, चिंतामणी तू अष्टविनायक,
सकळांची देवता रिद्धी सिद्धीच्या वर दयाळा
देईकृपेची छाया…. || ३ ||

गजानना गजानना गणराया (Gajanana Gajanana Ganaraya)

गजानना गजानना गणराया
मुखाने गाऊ या मोरया….  || धृ ||

फळे फुले वाहू या पूजन करू या
लाडू मोदकांचा नैवेद दावूया
भक्ती भावाने गणेशाला वंदूया, मुखाने …. || १ ||

हे मोरेश्वरा हे विघ्नहरा
गुण किती वर्णू तुझे लंबोदरा
चौदा विघेचा देवा असे तू पाथा, मुखाने ….. || २ ||

देव देवतांच्या हे महाराजा
नाम तुझे राहो सदा मुखी माझ्या
सारे मिळून गणपतीचा घोष करूया, मुखाने…. || ३ ||

हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळा (Ha Devancha Dev Ganapati Sarvahuni Vegala)

हा देवांचा देव गणपती सर्वाहुनी वेगळा
वाहतो दुर्वाकुर कोवळा….. || धृ ||

सिद्धी विनायक तू हेरंबा, मंगल दायक तू आरंभ
चिंतामणी तू जय सुख दाता, विषाल देही वैराग्याच्या
रंग तुझा सोवळा …… || १ ||

पशाकुंश करी विघ्नहरया, उभय करावी देशी अभया
अन्न ब्रम्ह परी मोदक माया, तुझ्या कृपेने मुका बोलतो
चालतसे पांगळा ….. || २ ||

गजमस्तक तू असीम बुद्धी, रिद्धी सिद्धीची समृद्धी
साहित्याची अमृत सिद्धी, प्रथम पाठीवर तुझा गणेशा
ॐ कार गिरविला …. || ३ ||

ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था (Omkar Swarupa Sadaguru Samrtha)

ॐ कार स्वरूपा सद्गुरू समर्था
अनाथांच्या नाथा तुझ नमो….. || धृ ||

नमो मायबापा गुरुकृपाधना, तोडीया बंधना मायामोहा
मोहजाळ माझे कोण नीरशील
तुझविण दयाळा सद्गुरुराया….. || १  ||

सद्गुरुराया माझा आनंदसागर, त्रैलोक्य आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्ररवी, रवी, शशी, अग्नी, नेणती रूप
स्वप्रकाश रुपा नेणे वेद…. || २ ||

एका जनार्दनी गुरुपरब्रम्, तयाचे पै सदामुखी || ३ ||

सभा रंगणी गण-गौवरी चा | नाचत नाचत आला, आला हो वरद विनायक आला (Sabha Rangani Gan Gauricha Naachat Nachat Aala, Aal Ho Varad Vinayak Aala)

सभा रंगणी गण-गौवरी चा |
नाचत नाचत आला,
आला हो वरद विनायक आला || धृ ||

प्रथम नमोया विघ्नराया |
मंगल मूर्ती या यश द्याया |
कार्यारंभी वंदू कृपाळा || १ ||

सकल गुणांचा शास्त्र कलांचा |
खेळ मांडीला शुभशकूलांचा |
श्रुत वर्ग हा तल्लीन झाला || २ ||

तू सुखकर्ता – तू दुखहर्ता |

तूच करता आणि करविता
मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया
मोरया मोरया मयुरेश्वर मोरया
मोरया मोरया भालचंद्र मोरया
मोरया मोरया एकदंत मोरया
मोरया मोरया गजानन मोरया
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया
मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया चिंतामणी मोरया
मोरया मोरया गिरिजात्मज मोरया
मोरया मोरया विघ्नेश्वर मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया
मोरया मोरया लंबोदर मोरया
मोरया मोरया महागणपती मोरया
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया वक्रतुंड मोरया || ३ ||

नमो नमो तुज श्री गणराया (Namo Namo Tujh Shri Ganaraya | Budhhi Dyavi Tujhe Gun Gaya)

नमो नमो तुज श्री गणराया
बुद्धी द्यावी तुझे गुण गाया

अंगी उठी शेंदुराची
कंठी शोभे माळ मुक्ता फळाची
जय घोष बोला मंगलमूर्ती मोरया ||१||

उमा महेश्वराचा असे तू बालक
भक्तांचा कैवारी, दृष्टांचा काळ
तुमची असू द्या हो आम्हावरी छाया ||२||

प्रती वर्षी घरोघरी पूजन चाले
जिकडे पहावे तिकडे भक्त आनंदाने डोले
जय घोष बोला गणपती बाप्पा  मोरया ||३||

विठ्ठल नाथाची असे विनवणी
कृपा असू द्यावी पूर्ण करितो मी लेखणी
बाळ आदिनाथ तव लागे पाया ||४||

Check Also

English Poem about Thanksgiving: The Pumpkin

The Pumpkin: English Poem to read on Thanksgiving Day Festival

The Pumpkin: John Greenleaf Whittier uses grandiose language in “The Pumpkin” to describe, in the …